top of page

Publisher- Vaidya Sau. Vrunda Sathe
Author- Vd. Sau. Vrunda Sathe
Language- Marathi
Edition- First Edition- 2013
Number Of Pages-  76
Prices- Rs. 85/-
About The Book-लेखिका - वैद्य सौ. वृंदा साठे
वैद्य सौ. वृंदा साठे पूर्वाश्रमीच्या विजया करमरकर, मिरज
शिक्षण - डी.एस्.ए.सी. (पीएच्. डी अग्निकर्म स्कॉलर)
जन्म - २७ नोव्हेंबर १९४२ रोजी, सबनिसवाडी, ता. माण येथे झाला.
शालेय शिक्षण - ज्युबिली इंग्रजी कन्या शाळा मिरज, सांगली.
१९५९-१९६० मध्ये एस्.टी.सी. व सी.पी.एड् मिरज येथे झाले. १९६० ते १९६३ तासगाव हायस्कूल, तासगाव येथे शिक्षिकेची नोकरी.
स्टेट लेव्हलपर्यंत खोखो, लंगडी, कबड्डी, थ्रो बॉल, रिंगटेनिस ह्यामध्ये प्राविण्य, रनिंग, स्किपिंग, रनिंग ब्रॉडजम्प, हायजंप ह्यामध्ये स्टेट लेव्हलपर्यंत प्राविण्य.
ह्या केन मलखांब करणाऱ्या भारतातील पहिल्या महिला आहेत. त्यांनी १९५० सालापासून १९६३ पर्यंत वेताचा मल्लखांब केला आहे. वडील वैद्य म. द. करमरकर, मिरज. करमरकर घराण्यात पिढीजात चालत आलेली अग्निकर्म चिकित्सा सातत्याने त्यांनी चालू ठेवली आहे. १९६४ साली लग्न झाल्यानंतर २ मुले झाल्यावर आयुर्वेदाचे चार वर्षेशिक्षण. १९७० ते १९७४ साली सोलापूर येथील आयुर्वेद कॉलेजमध्ये झाले. त्यानंतर लगेचच प्रॅक्टीसला सुरुवात केली. वडिलांच्या मार्गदर्शनाखाली १९७४ पासूनच अग्निकर्माला सुरुवात केली. आजतागायत ही चिकित्सा सातत्याने चालू आहे. हे पुस्तक लिहिण्याचा हेतू भयापोटी मागे पडलेली चिकित्सा नवीन वैद्य लोकांनी आयुर्वेद मॉडर्नसायन्सच्या दृष्टीने अभ्यासून समाजापुढे आणून त्याची महती जगापुढे आणावी. गेल्या ३८ वर्षांत हजारो रुग्णांना ह्या चिकित्सेने त्यांनी आराम दिला. अनेकाना १००% आराम मिळून २५ ते ३० वर्षेत्याचा त्यांना पुन्हा त्रास झालेला नाही. सर्व सामान्यांना ह्या चिकित्सेचा आर्थिकदृष्ट्या पण फायदा होतो आहे. कमी खर्चात, कमी वेळात दीर्घकाळ उपशय देणारी ही चिकित्सा कार्यरत राहावी, अशी लेखिकेची इच्छा आहे

Sukhad Chataka Agnikarma Chikitsa(Marathi)- By Vd. Sau. Vrunda Sathe

₹190.00 Regular Price
₹171.00Sale Price
Quantity
    bottom of page